नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे

By admin | Published: June 5, 2017 10:21 PM2017-06-05T22:21:29+5:302017-06-05T22:21:29+5:30

कणकवली शहरातील पार्किंग आरक्षण विकसित करण्याचे प्रकरण चिंताजनक आहे. नागरिकांचा विचार न करता निव्वळ विकासकाचा फायदा बघुन

Nitesh Rane will raise voice against the people of the life of the citizens - Nitesh Rane | नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे

नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे

Next

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 5 - कणकवली शहरातील पार्किंग आरक्षण विकसित करण्याचे प्रकरण चिंताजनक आहे. नागरिकांचा विचार न करता निव्वळ विकासकाचा फायदा बघुन हे आरक्षण विकसित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.मात्र, नागरिकांच्या आयुष्याशी जर कोणी खेळत असेल तर  त्याविरोधात आपण आवाज उठविणारच अशी आपली भूमिका स्पष्ट करतानाच वेळप्रसंगी न्यायालयात जावे लागले तरी चालेल. असे कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नीतेश राणे यांनी  सांगितले.
राणे पुढे म्हणाले, पार्किंग आरक्षण विषयाबाबत आपण नगरपंचायतीचे  मुख्याधिकारी अवधूत तावड़े यांना पत्र दिले. मात्र, त्यानी त्याचे उत्तर अद्याप दिलेले नाही. हे आरक्षण खासगी विकासकाला विकसित करायला दिले जात आहे. मात्र, त्याला परवानगी देताना सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. हे चिंताजनक आहे.
या ठिकाणी नागरिकांसाठी तळमजल्यावर पार्किंगची जागा देण्यात येणार आहे. तर विकासकाला डी.पी.रस्त्यालगत पार्किंगची सुविधा असणार आहे. तळमजल्यावरच्या पार्किंगच्या ठिकाणी आग लागण्यासारखी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. अशी घटना घडली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? मुख्याधिकाऱ्यांनी ही बाब संबधित खात्याच्या मंत्र्याना सांगितली आहे का? की मंत्र्याना अंधारात ठेवण्यात आले आहे.ते त्यानी जनतेसमोर स्पष्ट करावे.
अशाच प्रकारच्या पार्किंग बाबतच्या दिल्लीतील मॉलच्या खटल्यातील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या प्रती आमच्याजवळ आहेत. त्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेबद्दल स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यानी कणकवलीतील पार्किंग आरक्षणाला परवानगी देताना या बाबींकडे दुर्लक्ष केल्यास तो एकप्रकारे न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्यामुळे त्याविरोधात आम्ही निश्चितच न्यायालयात दाद मागणार आहोत.
तसेच या पार्किंग आरक्षणाबाबत संबधित खात्याच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आम्ही मागविले आहे. त्यातील बाबींची खातरजमा करून आगामी अधिवेशनात विधानसभेत मी स्वतः तर विधानपरीषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत.
हे आरक्षण विकसित करताना सर्व नियम धाब्यावर बसवून कणकवली वासियांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे? मुख्याधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत? याची उत्तरे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. कणकवली नगरपंचायतीतील काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच अन्य गटातटाच्या नगरसेवकांनी या पार्किंग आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी विशेषसभेची मागणी केली आहे. मात्र, ती का लावली जात नाही? आम्ही लोकप्रतिनिधी असून आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे या आआरक्षणाबाबत जनतेने आम्हाला प्रश्न विचारल्यास त्यांना आम्ही काय उत्तर देणार ? त्यामुळे या प्रश्नी आम्ही आवाज उठवित आहोत. यामध्ये कोणाला टार्गेट करण्याचा प्रश्न नसून अगदी आमच्या जवळची व्यक्ति जरी जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असेल तरी आम्ही त्याविरोधात आवाज उठविला असता असेही आमदार राणे यानी यावेळी स्पष्ट केले.
 
नगराध्यक्षांची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी!
    नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़ यांनी 11 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हाधिकाऱ्याना या पार्किंग आरक्षण विकसित करण्याविरोधात पत्र दिले होते. तर 7 डिसेंबर 2016 रोजी या निर्णयाचे समर्थन करणारे पत्र दिले होते. या दोन पत्रातील तफावतीचे रहस्य काय आहे? हे जनतेला त्यानी सांगावे. नगराध्यक्षा शहराच्या प्रथम नागरिक असून त्या कणकवलीच्या नागरिकांच्या जीवनाशी का खेळत आहेत?या प्रकरणी त्यांची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून  त्यांनी तसेच मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा केला पाहिजे.असे राणे यावेळी म्हणाले. 
 
प्रथम जनतेच्या कोर्टात जाणार!
या आरक्षण प्रश्नाबाबत आम्ही प्रथम जनतेच्या कोर्टात जाणार आहोत. येत्या दोन दिवसात शहरात सहयाची मोहीम राबविण्यात येईल. तसेच जनतेचे मत अजमाविले जाईल. कणकवलीकरांसाठी आम्ही तसेच सर्व नगरसेवक एकत्र येवून लढू असे आमदार राणे यावेळी म्हणाले. तसेच सहयाच्या मोहिमेवेळी किती नगरसेवक या लढ्यात आमच्या सोबत आहेत. हेही स्पष्ट होईल. असेही त्यानी यावेळी मिश्किलपणे सांगितले.
     

Web Title: Nitesh Rane will raise voice against the people of the life of the citizens - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.