नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांच्या अंगावर फेकले मासे
By admin | Published: July 6, 2017 03:04 PM2017-07-06T15:04:14+5:302017-07-06T15:06:12+5:30
मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 6 - मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत. मच्छीमारांच्या प्रश्नावर नितेश राणेंनी थेट सहाय्यक मत्स्य आयुक्तांनाच धारेवर धरलं आहे. यावेळी आक्रमक झालेल्या स्वाभिमान संघटनेचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले आहेत.
वैभववाडी-कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मालवण येथील जिल्हा कार्यालयात जाऊन सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट घेतली होती. अचानक आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलावर माशांची टोपली रिकामी केली. चर्चादरम्यानही नितेश राणेंनी आक्रमक पवित्र घेतल्यानं सगळेच अवाक् झाले.
संताप अनावर झाल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी थेट मत्स्य आयुक्तांना मासे फेकून मारले. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, तुम्ही पैसे खात असल्यामुळेच आम्हाला इथवर यावं लागलं. मच्छीमा-यांच्या प्रश्नावरून नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांना खडे बोलही सुनावले आहेत.
आणखी वाचा
(शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे)
(नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे)
(तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे)