विदर्भ आंदोलन संपवू शकेल एवढी शाई कोणाकडेही नाही, अणेंचा नितेश राणेंना टोला

By admin | Published: March 31, 2016 03:57 PM2016-03-31T15:57:31+5:302016-03-31T16:27:46+5:30

कोणाकडेही एवढी शाई नाही जे विदर्भ आंदोलन संपवू शकेल असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नितेश राणे यांना लगावला आहे

Nitesh Raneena, who did not have enough ink to finish Vidarbha agitation | विदर्भ आंदोलन संपवू शकेल एवढी शाई कोणाकडेही नाही, अणेंचा नितेश राणेंना टोला

विदर्भ आंदोलन संपवू शकेल एवढी शाई कोणाकडेही नाही, अणेंचा नितेश राणेंना टोला

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३१ - 'कोणाकडेही एवढी शाई नाही जे विदर्भ आंदोलन संपवू शकेल', असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. 'नाटेकर यांनी वेगळ्या कोकणाची मागणी केली त्याकडे नितेश राणे यांनी लक्ष द्यावं', असंदेखील अणे यावेळी बोलले आहेत. वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी गेलेल्या श्रीहरी अणेंवर सकाळी नितेश राणेंच्या समर्थकांनी शाई हल्ला केला होता. अणेंच्या भाषणाच्यावेळी नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन गोंधळ घातला व त्यांच्या अंगावर शाई फेकली.   
 
दरम्यान श्रीहरी अणे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली सचिवालयात ही बैठक पार पडली. 'वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून आपचे खासदार वेगळ्या विदर्भासंदर्भात संसदेत आवाज उठवणार आहेत', अशी माहिती अणे यांनी बैठकीनंतर दिली आहे. 'केजरीवाल यांचा आंदोलनला पाठींबा असून विदर्भाचा आवाज वाढतोय तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय', असा आरोप अणे यांनी यावेळी केला. 
श्रीहरी अणेंनी भाजपावर टीका करत 'भाजपानं विश्वासघात केला असून बहुमत मिळालं परंतू आश्वासन पूर्ण केलं नसल्यांच', म्हंटलं आहे. श्रीहरी अणे यांनी विदर्भाबरोबर मराठवाडा स्वतंत्र करण्याचा विचार मांडला होता. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन श्रीहरी अणेंना महाधिवक्तापदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचे पडसाद अधिवेशनात उमटले होते. अखेर अणेंनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला होता.

Web Title: Nitesh Raneena, who did not have enough ink to finish Vidarbha agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.