Nitesh Rane : नीतेश राणे यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:01 AM2021-12-28T06:01:13+5:302021-12-28T06:01:26+5:30
Nitesh Rane : निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे तर विधिमंडळ अधिवेशनातही या हल्ल्याचे पडसाद उमटले. हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करा,
अशी मागणी शिवसेना सदस्यांनी लावून धरली.
निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. पोलीस अधीक्षक स्वत: या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून विधान भवनाच्या पायऱ्यांवरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘म्याऊ-म्याऊ’ असा आवाज काढल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आणि सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्षांना तहकूब करावे लागले.
सुड भावनेतून कारवाई : नारायण राणे
आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव दिसत आहे. त्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नागपूरला सांगितले.
ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे होते. दरम्यान, संध्याकाळी दौरा अर्धवट सोडून
ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.
नीतेश राणे यांनी काहीही केलेले नाही. त्यांचा काहीही संबंध नाही. सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात आहे. आमदार राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. त्यांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. सरकारला जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. अशा प्रकारची कारवाई होत असल्याचे समजल्याने काेर्टात जावेच लागले, असेही ते म्हणाले.