नितीन आगे हत्या प्रकरण- फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार हायकोर्टात दाद मागणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 02:46 PM2017-12-05T14:46:45+5:302017-12-05T14:54:18+5:30

नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

nitin aage muder case | नितीन आगे हत्या प्रकरण- फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार हायकोर्टात दाद मागणार : मुख्यमंत्री

नितीन आगे हत्या प्रकरण- फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार हायकोर्टात दाद मागणार : मुख्यमंत्री

Next

मुंबई- नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

खर्डा या कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या 17 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 9 संशयितांची अहमदनगर न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. 26 पैकी 13 साक्षीदार फितूर झाल्याने सबळ पुराव्याअभावी त्याचा निकालावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर नितीन यांचे वडील राजू आगे यांनी काल (दि. 4 डिसेंबर) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

तेराही फितुर साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.  त्याबाबतचा पोलिसांचा प्रस्तावही विधि व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे. 

Web Title: nitin aage muder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.