नितीन आगेच्या मारेक-यांना फाशी द्या - भालचंद्र मुणगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:34 AM2017-12-07T04:34:37+5:302017-12-07T04:34:53+5:30
दलित अल्पवयीन तरुण नितीन आगे प्रकरणात सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नियोजन आयोगाचा
मुंबई : दलित अल्पवयीन तरुण नितीन आगे प्रकरणात सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नियोजन आयोगाचा, माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राजगृह ते चैत्यभूमी असा लाँग मार्च काढला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून दोषींना फाशी देण्याची मागणी करणाºया या मार्चमध्ये नितीनचे वडील राजू आगेदेखील होते. मार्च चैत्यभूमीवर पोहोचल्यानंतर मुणगेकर यांनी सरकारवर टीका केली. मार्चमध्ये विधि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १ जानेवारीपासू राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
तपास सुधारित कायद्यानुसार व्हावा
मुळात नितीनचा खून २८ एप्रिल २०१४ रोजी झाला. या आधी ४ मार्च २०१४ रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९च्या कायद्यात सुधारणा झाली होती, तरीही चौकशी अधिकाºयांनी जुन्या कायद्यानुसार तपास केला. परिणामी, या हत्येचा पुनर्तपास सुधारित कायद्यानुसार सीबीआयने करण्याची मागणीही मुणगेकर यांनी या वेळी केली.