दोन वर्षांत राज्यातील सिंचन 40 टक्क्यांवर नेणार, नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 11:51 PM2017-09-17T23:51:59+5:302017-09-17T23:52:13+5:30

सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे.

Nitin Gadkari claims to take irrigation to 40% in two years | दोन वर्षांत राज्यातील सिंचन 40 टक्क्यांवर नेणार, नितीन गडकरींचा दावा

दोन वर्षांत राज्यातील सिंचन 40 टक्क्यांवर नेणार, नितीन गडकरींचा दावा

Next

नागपूर, दि. 17 - सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच शेतकरी आत्महत्या कमी होतील. पुढील दोन वर्षांत राज्यातील सिंचन ४० टक्क्यांवर नेणार, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे रविवारी त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.

आपल्या देशात पंचवार्षिक योजना ज्या दिशेने गेली, त्यावर विचार करण्याची गरज आहे. समाजवाद, साम्यवाद आणि ‘पुंजीवाद’ या चक्रात कृषी धोरण आखताना गोंधळ झाला. सिंचनासाठी ज्यावेळी निधी देणे अपेक्षित होते तेव्हा एअर इंडियासाठी ७० हजार कोटींची विमाने विकत घेण्यात आली. मुळात आजच्या तारखेत सिंचनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. धरणे भरली असताना शेतकºयांना पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य धोरण आखून सिंचन क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. नदीजोड प्रकल्पात राज्यामध्ये प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे निश्चित सिंचन वाढेल, असे गडकरी म्हणाले. तांदूळ, गहू, कापसासारख्या पिकांमुळे शेती फायद्यात येऊ शकत नाही. या पिकांना वाढीव भाव देणेदेखील शक्य नाही. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग शेतकºयांनी सुरू केले तर त्यांचे उत्पन्न सहज वाढू शकते, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. शोभा फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या समस्या कधीच सुटणार नाहीत. शेतकºयांच्या मानसिकतेचा विचार करून धोरणे आखायला हवीत. विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

...अन्यथा आपल्यावरील विश्वास संपेल

शेतीच्या समस्यांवर आंदोलन करणे सोपे असते. मात्र त्यावर मार्ग काढणे जास्त आवश्यक आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलने केली. आता सगळीकडेच आमची सत्ता आहे. त्यामुळे मी जनप्रतिनिधींना म्हणतो की चर्चा करण्यापेक्षा उत्तरे शोधा. अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास संपेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.

दिल्लीला पाण्याचे दु:ख कळलेच नाही

उत्तर भारतात सिंचनाची फारशी समस्या नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकांचे पाण्याचे दु:ख माहीत नाही. आपण आजपर्यंत आपले दु:ख व समस्या योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही व त्यांनादेखील पाण्याचे दु:ख कळले नाही. मात्र आता काहीही झाले तरी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

Web Title: Nitin Gadkari claims to take irrigation to 40% in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.