Nitin Gadkari: 'ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'; नितीन गडकरींनी नाशिककरांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 08:08 PM2021-10-03T20:08:40+5:302021-10-03T20:09:38+5:30

Nitin Gadkari Nashik visit: थीम पार्कचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे ते म्हणाले.

Nitin Gadkari Inaugurate Pt. Deendayal Upadhyaya Theme Park Garden in Nashik | Nitin Gadkari: 'ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'; नितीन गडकरींनी नाशिककरांना दिला मोलाचा सल्ला

Nitin Gadkari: 'ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'; नितीन गडकरींनी नाशिककरांना दिला मोलाचा सल्ला

Next

नाशिकमधील थीम पार्क उत्तम बनवण्यात आला आहे. पत्नी आज माझ्यासोबत होती. मी तिला म्हणालो बघ इथली शेती किती चांगली आहे. नाशिकमधील हा निसर्ग अशाच प्रकारे टिकवून ठेवा. पाच वर्षांत मी नागपूरचा वायू आणि जलप्रदूषण संपवण्याचा निर्णय घेतलाय. अशाच प्रकारे सर्वजण आपल्या जिल्ह्यासाठी प्रयत्न करावेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. गडकरी आज सपत्नीक नाशिक दौऱ्यावर होते. (I am responsible for noise pollution; Nitin Gadkari made a big revelation in Nashik.)

थीम पार्कचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते करण्यात आले. अमिताभ बच्चन आणि मी आज एका कार्यक्रमात होतो. अमिताभ बच्चन आज मला म्हणाले तुम्ही खूप तरुण दिसताय. मी त्यांना म्हणालो कोरोना झाल्यापासून रोज एक तास सकाळ व्यायाम आणि योगा करतो. त्यामुळे मी आज तंदुरुस्त आहे, असे उत्तर त्यांना दिल्याचे गडकरी म्हणाले. नाशिककरांनी उद्यानाचा तुम्ही पण लाभ घ्यावा. आपल्याला प्रदूषण मुक्त हवा मिळाली तर डॉक्टरची गरज भासणार नाही.  शुद्ध हवेसाठी अशा उद्यानाची गरज आहे, असा सल्ला गडकरींना नाशिककरांना दिला. 

गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी अभ्यास करावा.  5 वर्षात ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण मुक्त नागपूर करणार असल्याचे ठरवले आहे. प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तानी ठरवल्यास आपण पुढे जाऊ.  सर्व ध्वनी प्रदूषणला मी जबाबदार आहे. त्यामुळे गाड्यांवरील लाल दिवे मी बंद केले. त्यामुळे बरेच जण माझ्यावर नाराज आहेत, अशी मिश्किल टिपण्णीदेखील गडकरीनी केली. 

आता मी कायदा करणार आहे, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही. सर्व भारतीय वाद्ये हवीत. अॅम्बुलन्स पोलिसांचेही कर्कश आवाजही चालणार नाहीत.  शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासुन तयार केलेले ईथेनॉल वापरावे, असेही गडकरी म्हणाले. 

Web Title: Nitin Gadkari Inaugurate Pt. Deendayal Upadhyaya Theme Park Garden in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.