EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

By यदू जोशी | Published: August 14, 2021 11:08 AM2021-08-14T11:08:22+5:302021-08-14T12:45:35+5:30

Nitin Gadkar Letter to CM Uddhav Thackeray: गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे

Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray; Shiv Sena terror will have to stop work on highways | EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

googlenewsNext
ठळक मुद्देही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावानितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत

यदु जोशी

मुंबई - महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना अलिकडेच पाठविले आहे.  Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray; Shiv Sena terror will have to stop work on highways

गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

गडकरी  पत्रात काय म्हटले?
१.अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे. 

२.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

 

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे. 

Uddhav Thackeray and Nitin Gadkari Reviewed The Work Of National Highways - गडकरींची 'ही' सूचना CM ठाकरेंना मान्य; दिले तातडीचे निर्देश | Maharashtra Times - Maharashtra Times

वाशिम जिल्ह्यातील धमकीसत्राच्या चौकशीचे गृह विभागाचेआदेश
नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिल्याची माहिती आहे. गृह विभागाने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना १३ ऑगस्टला एक पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत, विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भांडावून सोडत आहेत व त्यांनी न ऐकल्यास त्यांचे काम बंद पाडत आहेत या गडकरी यांच्या तक्रारीबाबत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी, या तक्रारींवरून लोकप्रतिनिधींवर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का याची माहितीही गृह विभागाने मागविली आहे. पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात वाशीमच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. 

याबाबत यवतमाळ वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, माझी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. मी एवढेच सांगते, माझ्या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची नव्वद टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी लोकांचा विरोध असल्याने कामे थांबली होती असं त्यांनी म्हटलं. 

Read in English

Web Title: Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray; Shiv Sena terror will have to stop work on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.