“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 09:44 AM2021-12-28T09:44:49+5:302021-12-28T09:46:49+5:30

मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांशी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरासाठी धोरण तयार करण्यावर चर्चा झाली, असे नितीन गडकरी म्हणाले.

nitin gadkari said use of drones in the farm sector can generate about 50 lakh jobs | “कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

Next

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामासाठी ओळखले जातात. रस्ते बांधणीपासून ते कृषी क्षेत्रापर्यंत अनेकविध बाबतीत त्यांचे विचार आणि योगदान नमूद केले जाते. यातच आपण अनेकदा नवनवीन कल्पना, संकल्पना यांसंदर्भात चर्चा करत असतो, असे सांगत कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर सुरू केल्यास ग्रामीण भागात सुमारे ५० लाख रोजगार निर्माण होऊ शकतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर येथील एग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या समारोप समारोहात ते बोलत होते. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली आहे. ड्रोनचे तंत्रज्ञान शेतीसाठी कसे उपयुक्त ठरू शकेल, यावरही उहापोह करण्यात आला. आमच्या शेतात ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत शक्य झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

ड्रोन कृषी आणि लघु उद्योग एकमेकांना पूरक

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरासंदर्भात सविस्तर चर्चा केली. शेतीत ड्रोनचा वापर आणि लघु उद्योग एकमेकांना पूरक तसेच संबंधित आहेत. याविषयी एक धोरण तयार करण्यावर चर्चा झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात जवळपास ५० लाख रोजगार निर्माण होऊ शकतील. याशिवाय खर्चात बचत झाल्यास त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच होणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, लिथियम-आयर्न बॅटरीपासून चालणाऱ्या ड्रोनची किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे. तर इथेनॉल इंधनापासून चालणाऱ्या मानवरहित हवाई वाहनची किंमत १.५ लाख रुपये असेल, जे स्वस्त आहे. शेतात कीटकनाशकांच्या फवारणीसाठी लागणाऱ्या ड्रोन संचलनासाठी पायलटची आवश्यकत असेल, या एकूणच सर्व गोष्टींमुळे रोजगार मोठ्या प्रमाणात वाढतील, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: nitin gadkari said use of drones in the farm sector can generate about 50 lakh jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.