प्रांतीय, भाषिक राजकारण करायचं नाही, पण...; मुंबई-पुण्यातील लोकसंख्येबाबत गडकरींची मोठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:05 PM2020-06-27T14:05:44+5:302020-06-27T14:08:21+5:30

मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही.

Nitin Gadkari says decongestant mumbai and pune in future is very important | प्रांतीय, भाषिक राजकारण करायचं नाही, पण...; मुंबई-पुण्यातील लोकसंख्येबाबत गडकरींची मोठी सूचना

प्रांतीय, भाषिक राजकारण करायचं नाही, पण...; मुंबई-पुण्यातील लोकसंख्येबाबत गडकरींची मोठी सूचना

Next
ठळक मुद्देमुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे - गडकरीगडकरी यांनी , उद्योग, व्यापर, शेती आणि पर्यावरण, आदी क्षेत्रांसदर्भातही भाष्य केलेमुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही

मुंबई : कोरोनाचे संकट संपल्यानंतर, भविष्यात मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. मला प्रांतीय आणि भाषिक राजकारण करायचे नाही. मात्र, मुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोनाचं संकट किती गंभीर आहे, हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे   #e_conclave मध्ये बोलत होते. 

गडकरी यांनी यावेळी, उद्योग, व्यापर, शेती आणि पर्यावरण, आदी क्षेत्रांसदर्भातही भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रासाठी व्यापाराच्या क्षेत्रात कोणकोणत्या वेगळ्या संधी आहेत, याचाही सविस्तर उहापोह केला. तसेच भविष्यात समुद्र आणि नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. तरच पर्यटनासाठी बाहेरून लोक महाराष्ट्रात येतील. सध्याचा काळ हा कठीण आहे. मात्र, महाराष्ट्राकडे एक राज्य म्हणून खूप क्षमता आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल, असेही गडकरी म्हणाले.

महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. भविष्यात राज्यातील वाहने ही एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉलमिश्रीत पेट्रोलवर चालवण्यात यावीत. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी  होईल. तसेच वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचेल, असे गडकरी म्हणाले. या वेळी त्यांनी शेती आणि इतर क्षेत्रांवरही भाष्य केले. महाराष्ट्राने शेती आणि इतर क्षेत्रांतही अभिनव उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.

मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही -
मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. कदाचित राज्याबाहेर आल्यावरच मराठी संस्कृतीचे मोठेपण समजते, अशी भावनाही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

Web Title: Nitin Gadkari says decongestant mumbai and pune in future is very important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.