Nitin Gadkari : "तुम्ही PM झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ", नितीन गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 08:34 AM2024-09-15T08:34:38+5:302024-09-15T08:36:56+5:30

Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे.

nitin gadkari says he once declined an offer from a political leader to support his candidacy for prime minister, Nagpur | Nitin Gadkari : "तुम्ही PM झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ", नितीन गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर!

Nitin Gadkari : "तुम्ही PM झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ", नितीन गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर!

नागपूर : पंतप्रधान पदावरून नितीन गडकरी यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. या दरम्यान आता केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारली असल्याचंही सांगितलं. 

शनिवारी (दि.१४) नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितलं की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिलं आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचं नाव उघड केलं नाही किंवा घटनेची माहिती दिली नाही. नितीन गडकरी म्हणाले, मी नाव सांगणार नाही, पण मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, मी म्हणालो तुम्ही मला पाठिंबा का द्यावा आणि मी तुमचा पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधान हे माझ्या आयुष्यातील लक्ष नाही. मी माझ्या मूल्यांशी आणि माझ्या संघटनेशी एकनिष्ठ आहे. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करत नाही. हे मूल्य भारतीय लोकशाहीचा पाया आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात पंतप्रधान पदावरून नितीन गडकरी यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळालं होतं. त्यावेळीही लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. या निवडणुकीत भाजपनं २४० जागा जिंकल्या. त्यामुळं भाजपनं डीटीपी व जेडीयूच्या मदतीनं केंद्रात सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले आहेत.

Web Title: nitin gadkari says he once declined an offer from a political leader to support his candidacy for prime minister, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.