समस्यांचे रूपांतर संधीत करा- नितीन गडकरी

By admin | Published: December 26, 2015 02:44 AM2015-12-26T02:44:51+5:302015-12-26T02:44:51+5:30

मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी युवकांना आवाहन

Nitin Gadkari should transform the problems: | समस्यांचे रूपांतर संधीत करा- नितीन गडकरी

समस्यांचे रूपांतर संधीत करा- नितीन गडकरी

Next

अकोला : समस्या सर्वांच्याच जीवनात असतात. समस्यांना घाबरण्याऐवजी, त्यांचे रुपांतर संधीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत केंद्रिय नागरी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर होते. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजी राजे, खा. संजय धोत्रे, खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, उत्तरप्रदेशमधील खासदार अनुप्रिता पटेल, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. रणधिर सावरकर, आ. हरीष पिंपळे, आ. आकाश फुंडकर,माजी मंत्री वसंतराव धोत्रे, महापौर उज्वला देशमुख, उद्योजक सुरेश हावरे, सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे आदींसह सेवा संघाचे विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मराठा सेवा संघाने सामाजिक क्षेत्रात भरपूर काम केले, आता शेतकर्‍यांच्या भल्यासाठी कामाला लागावे असे आवाहन गडकरी यांनी केले. महापुरुषांची बरोबरी आम्ही करु शकत नाही, मात्र महापुरुषांच्या विचारांचे आचारण आम्ही करु शकतो. आपला सगळा भर परमेश्‍वर अथवा सरकारवर असतो. सगळ त्यांनीच करावं ही आपली अपेक्षा असते. परंतु सरकार व परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवू नका, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करुन, स्वयंप्ररेणेने काम करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. समाजवाद, साम्यवाद, पुंजीवाद याचा आता उपयोग नाही, तर भविष्यात रोजगार निर्माण करणारी निती आम्हाला अवलंबवावी लागेल, असे मत गडकरी यांनी मांडले. सामाजिक अर्थनिती रुजविण्यासाठी आता मराठा सेवा संघाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. टाकाऊ वस्तुपासून अनेक टिकाऊ वस्तु बनविता येतात, त्यादृष्टीने येणार्‍या काळात प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगतांना गडकरी यांनी इथेनॉल, सांडपाणी, पिकांचा कचरा, डोक्याचे केस आदी वस्तुंचा कशा पद्धतीने नागपूर परिसरात उपयोग केला, याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार भावना गवळी, अनुप्रिया पटेल, संभाजी महाराज यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी शेतकर्‍यांच्या कर्जाला मुदतवाढ देऊन त्यांचे व्याज भरण्याची तसदी शासनाने घ्यावी असे आवाहन केले. स्वागतपर मनोगत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मुधकर मेहकरे यांनी केले. संचालन अमोल मिटकरी यांनी केले.

Web Title: Nitin Gadkari should transform the problems:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.