नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 01:24 PM2021-08-07T13:24:25+5:302021-08-07T13:26:18+5:30

Bhagat singh Koshyari On Nitin Gadkari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक केलं.

Nitin Gadkari is a very smart person he can produce oil even from stone Governor bhagat singh koshyari | नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल

नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल

Next
ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक करत ते अतिशय हुशार व्यक्ती असल्याचं म्हटलं. बांबू लागवडींची पाहणी करताना कोश्यारी यांनी गडकरींचं कौतुक केलं. यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्लाही दिला. सबका साथ सबका विकास याप्रमाणे एकत्र राहा असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी नितिन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. "नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात," असं असं त्यांनी नमूद केलं. "बांबू लागवडीला गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या," असा सल्ला कोश्यारी यांनी कुलगुरूंना दिला. 

माध्यमांची भीती अधिक भीती वाटते
‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, तो वो मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी केलं होतं. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हे वक्तव्य केलं. विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांनी श्री गुरुगोविंदसिंघ अध्यासन केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले, मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांमध्ये गेलो तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. 

नियोजनात नसलेल्या गणित संकुलाची इमारत पाहण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. नंतर त्यांनी रेन हार्वेस्टिंगची पाहणी केली. रेन हार्वेस्टिंगला मदतीसाठी मी राज्य सरकारला सूचित करतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांनी विद्यापीठ परिसरातील जलपुनर्भरण योजनेचीही पाहणी केली. वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन आणि पाहणी दौरा राज्यपालांनी टाळला. 

Web Title: Nitin Gadkari is a very smart person he can produce oil even from stone Governor bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.