नितीश कुमारांचे शिवसेनेला आग्रहाचे निमंत्रण
By admin | Published: November 17, 2015 02:28 AM2015-11-17T02:28:34+5:302015-11-17T02:28:34+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत: फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिहारला
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत: फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिहारला जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनने भाजपा आघाडीचा पराभव केला. या विजयानंतर नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. मंगळवारी पाटणा येथील गांधी मैदान येथे जंगी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील विविध नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नवीन आघाडी उघडण्याची खेळी नितीश कुमार यांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून नितीश कुमार यांनी स्वत: थेट उद्धव ठाकरे यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले.