नितीश यांचा राजीनामा

By Admin | Published: May 18, 2014 01:05 AM2014-05-18T01:05:36+5:302014-05-18T01:05:36+5:30

नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े

Nitish resigns | नितीश यांचा राजीनामा

नितीश यांचा राजीनामा

googlenewsNext
>पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली : नव्या मुख्यमंत्र्याचे नाव आजच्या बैठकीत ठरणार
 
पाटणा : लोकसभा निवडणुकीतील जनता दलाच्या (युनायटेड) दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी शनिवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला़ विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मात्र त्यांनी केली नाही़
नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े नितीश यांनी जदयुच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होत़े तथापि, बिहारमधील 4क् जागांपैकी केवळ दोन जागा त्यांना मिळाल्या़ 24 उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली़ पक्षाची अशी धूळधाण झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल डी़वाय़ पाटील यांच्याकडे पाठवून दिला़ राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आह़े लोकसभा निवडणुकीचे निकाल जदयुसाठी निराशाजनक राहिल़े जनमताचा कौल मान्य करून मी आणि माङया मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आह़े मी पक्षाच्या प्रचारमोहिमेचे नेतृत्व केल़े त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणो माङो कर्तव्य आह़े, असे त्यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल़े विद्यमान विधानसभेला पाच वर्षासाठी जनादेश मिळालेला आह़े त्यामुळे पर्यायी सरकार स्थापनेचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आपण विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केलेली नाही़, असेही त्यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)
 
काथ्याकूट कशाला, आत्मचिंतन करा!
कदाचित, नरेंद्र मोदींसोबत असलेल्या कडवट संबंधांमुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला़ मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि नितीश कुमारांना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री म्हणून काम करायची इच्छा नसावी, असे दिसत़े
-शकील अहमद, काँग्रेस सरचिटणीस
 
जिंकल्यास ठीक आणि पराभव झाल्यास सांप्रदायिक वा अन्य लाटेचा परिणाम म्हणून काथ्याकूट करणो योग्य नाही़ नितीश यांनी दुस:यांवर ठपका ठेवण्यापेक्षा विनम्रपणो पराभव मान्य करावा व आत्मचिंतन कराव़े 
- व्यंकय्या नायडू, भाजपा नेत़े
 
यूपीए सरकार विसजिर्त
संपुआ सरकारचे 1क् वर्षे नेतृत्व करणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, संपुआची अखेरची मंत्रिमंडळ बैठकही घेण्यात आली. त्यात 15वी लोकसभा विसजिर्त करण्याचा प्रस्तावही राष्ट्रपतींकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुखर्जी यांनी हा राजीनामा मंजूर केला व नवे सरकार स्थापन होईर्पयत पदांवर कायम राहण्याचा सल्ला मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहका:यांना दिला. रात्री राष्ट्रपतींनी मावळत्या मंत्रिमंडळासाठी भोजन समारंभ आयोजित केला.
 

Web Title: Nitish resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.