मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
By Admin | Published: May 26, 2017 07:33 AM2017-05-26T07:33:42+5:302017-05-26T14:17:31+5:30
अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 26 - पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. 20 प्रभागामधील 78 पैकी 51 जागांवर आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फक्त 25 जागांवर आघाडीवर आहे.
महापालिकेची पहिलीच निवडणुक असल्याने सर्वच राजकिय पक्षांनी पनवेलवर लक्ष केंद्रीत केले होते. भविष्यात या परिसरात येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना विकास क्षेत्र व सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे देशातील मुंबईनंतरचे प्रमुख शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण होत आहे. सिडको व खाजगी विकासकांच्या माध्यमातून पाच वर्षात 60 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरात होत असल्याचे महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मतमोजणीच्या पहिल्या दोन तासामध्येच भाजपाने जोरदार मुसंडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरपीआयला सोबत घेवून सर्व 78 जागा लढविणा-या भाजपाने 51 जागांवर आघाडी घेतली आहे. रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी नाकारल्याचे प्राथमीक चित्र दिसत आहे. शेकाप आघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे व डझनभर सेना नेत्यांनी प्रचार करूनही शिवसेनेला अद्याप समाधानकारक यश आलेले नाही. फक्त एक जागेवर यश मिळाले आहे.
LIVE UPDATES
पनवेल महापालिका
एकूण जागा 78
भाजपा - 51
शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - 25
शिवसेना- 0
इतर0
कळंबोली प्रभाग क्रमांक ७ - भाजपाचा 4 जागांवर विजय
१) अमर पाटील
२) विद्या गायकवाड
३) प्रमिला पाटील
४) राजेंद्रकुमार शमा
प्रभाग क्रमांक 4 - भाजपाचे सर्व उमेदवार विजयी
पक्षीय बलाबल
महाआघाडी : शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12
भाजपा - 78
शिवसेना -65
स्वाभिमानी शेतकरी संघटना- 13
भिवंडी महापालिका -
भिवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मतमोजणीसाठी २६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका -
पनवेल महापालिकासाठी ५५ टक्के मतदान झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.