मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

By admin | Published: May 26, 2017 11:09 AM2017-05-26T11:09:18+5:302017-05-26T16:02:00+5:30

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेस एकहाती सत्ता मिळवली आहे.

NMC elections: Congress is "Sultan" | मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 26 - भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसनं 47 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. दरम्यान, भिवंडी मनपा निवडणुकीत शिवसेना,  भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. या निवडणुकीत सत्ता राखण्याचं काँग्रेसमोर आव्हान आहे. तर दुसरीकडे, येथे मोदी लाटेची जादू दिसली नाही. 
 
दरम्यान, निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
भिवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मतमोजणीसाठी २६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 
 
विजयी निकाल 
शिवसेना -  12
काँग्रेस    -  47
भाजपा   - 19
रिपाइं     - 4 
कोणार्क  -  4
सपा      - 2
अपक्ष    - 2  
 
भाजपाचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपाचा 3 जागांवर विजय  
प्रभाग क्रमांक 18 अ - मोमिन नदीम अनीस विजयी (3722 मते)
प्रभाग क्रमांक 18 क - सिद्दीकी शाहीन फरहान विजयी (5940 मते)
प्रभाग क्रमांक 18 ड  - नकाते सुहास जालिंदर विजयी (5688 मते)
 
काँग्रेसचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 2 अ -  अन्सारी नमरा औरंगजेब विजयी (6868 मते)
प्रभाग क्रमांक 2 क -  ईमरान वली मोहमद खान विजयी  (7170 मते)
प्रभाग क्रमांक 9 अ - प्रशांत लाड विजयी (5169 मते)

कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 1 अ -  विलास पाटील विजयी (5693 मते) 
प्रभाग क्रमांक 1 ब - प्रतिभा पाटील विजयी (5771 मते)
प्रभाग क्रमांक 1 क - सविता कोलेकर विजयी (4560 मते)
प्रभाग क्रमांक 1 ड -  नितिन पाटील विजयी  (5275 मते) 

शिवसेनेचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 22 ब  - तुषार चौधरी विजयी (4067 मते) 
 
रिपाइंचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 3 क - रिपाइंनं उघडलं खातं, रिपाइंचे  सिद्दीकी रिहाना मेहमूद आलम विजयी (3422 मते)  
 
 

Web Title: NMC elections: Congress is "Sultan"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.