महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:45 AM2018-01-03T05:45:26+5:302018-01-03T05:45:41+5:30

कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे.

 NMC needs to put an end to him: Nitesh Rane | महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे

महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे

googlenewsNext

मुंबई - कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे. या मुदतीनंतर कोणावरच कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे स्वाभिमान संघटना १५ जानेवारी रोजी पालिकेवर मुंबईकरांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काँग्रेस आमदार व स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केली. पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मुंबईकरांशी कसलेच देणेघेणे नाही त्यामुळे पालिकेला टाळे ठोकायला हवे, असेही ते म्हणाले.
कमला मिल जळीतकांडानंतर महापालिका प्रशासन मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे. ३२५ रेस्टॉरंटवर कारवाई सुरू असल्याचा दावा करण्यात आला. अचानक इतकी मोठी कारवाई केली याचा अर्थ या सर्व ठिकाणी अनधिकृत अनियमितता असल्याची कल्पना होती. दोन दिवस धडक तोडक कारवाई करण्याच्या फार्सनंतर आता १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. केवळ सेटलमेंटसाठी ही मुदत आहे. या कालावधीत ज्यांना जिथे पैसे पोहोचवायचे आहेत तिथे पोहोचवता यावेत यासाठीच हा मुदतीचा फार्स असल्याचे नितेश राणे म्हणाले.
स्वत: पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाºयांच्या भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे. त्यामुळे सर्व अधिकाºयांवर नियमानुसार कारवाई करीत त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. ते सोडून आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा
डाव आखण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात कोणी पालिकेच्या विरोधात काही बोलू-लिहू नये, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेने आखलेले हे षड्यंत्र आहे, असा आरोप राणे यांनी
केला आहे.
पालिका आयुक्तांनी कारवाई करू नये यासाठी बड्या धेंडांचा दबाव असल्याचे स्वत: आयुक्तच सांगत आहेत. असे असेल तर आयुक्तांनी गप्प बसता कामा नये. प्रत्यक्षात पालिका आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेत या प्रकरणातील सर्व बड्या धेंडांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीदेखील राणे यांनी केली.

बाळा खोपडेचा दबदबा
बाळा खोपडे नावाची व्यक्ती हॉटेलात परवानगी, ओसी मिळवायची असेल, तर थेट काम करून देते. त्याच्याकडे रेटकार्ड तयार आहे. त्याला आमदार, खासदार किंवा नगरसेवकाची गरजच नाही.
या व्यक्तीवर कारवाई करण्याची हिंमत आयुक्तांनी दाखवावी. त्यांनी ही हिंमत दाखवल्यास गेट वे आॅफ इंडियावर जाहीर सत्कार करेन, असे राणे म्हणाले.

रूफटॉपला विरोध नाही
रूफटॉपच्या संकल्पनेला आमचा विरोध नाही. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी करायला हवी.
जगभरात अनेक मोठ्या शहरांत नाइटलाइफ व रूफटॉप आहे. त्यामुळे या धोरणातील त्रुटी दूर करून योग्य अंमलबजावणी करावी.

सीबीआय चौकशी करा
कमला मिलची सर्व चौकशी पारदर्शक होण्यासाठी आयुक्तांकरवी नव्हे, तर सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी.

Web Title:  NMC needs to put an end to him: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.