सणोत्सवाच्या काळात बेकायदा मंडप नको, उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:55 AM2018-08-08T05:55:59+5:302018-08-08T05:56:15+5:30

मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत सणोत्सवाच्या काळात एकही बेकायदा मंडप नको.

No banned pavilion during the festival, the High Court | सणोत्सवाच्या काळात बेकायदा मंडप नको, उच्च न्यायालय

सणोत्सवाच्या काळात बेकायदा मंडप नको, उच्च न्यायालय

Next

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत सणोत्सवाच्या काळात एकही बेकायदा मंडप नको. यासंदर्भात आधी दिलेल्या आदेशांचे पालन झाले नाही, तर राज्य सरकार व महापालिकांना अवमान कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.
सणांच्या काळात सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारून वाहतूककोंडी करणाऱ्या बेकायदा मंडपांवर कारवाईव करण्याचे आदेश यापूर्वीच उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पालिकांना दिले. ‘आदेशांचे पालन झालेले नाही. न्यायालयाच्या आदेशाचे, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून स्थानिक स्वराज्य संस्था बेकायदा मंडपांना सहन करत आहेत,’ असे निरीक्षण न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नोंदविले.
‘मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांबाबतचा तरी अनुपालन अहवाल सादर करा. जर या शहरांत आदेशांचे पालन करण्यात आले नाही, तर आम्ही अवमान कारवाई करू,’ अशी तंबी न्यायालयाने दिली.
>सुनावणी १२ सप्टेंबरला
सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणाºया अनेक याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली.

Web Title: No banned pavilion during the festival, the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.