नाही पुस्तक, नाही शाळा; हवे तेवढे खुशाल खेळा!
By Admin | Published: December 9, 2014 02:09 AM2014-12-09T02:09:30+5:302014-12-09T02:09:30+5:30
‘घरचा पुढचा दार झाडूचा आसा मागच्या दारात खूप पतेरो साठलो आसा, बाळ्याक शाळेत पोचूक उशीर होता, बायोचो डबो आजून करूक सवड नाय गावना,
कपिल गुरव ल्ल आचरा (सिंधुदुर्ग)
‘घरचा पुढचा दार झाडूचा आसा मागच्या दारात खूप पतेरो साठलो आसा, बाळ्याक शाळेत पोचूक उशीर होता, बायोचो डबो आजून करूक सवड नाय गावना, सकाळचे 1क् वाजत इले तरी अजून खयचाच काम झाला नाय हा’, कुटुंबात रंगलेले असे संवाद. ना कसली कामाची कटकट ना कसली धावपळ. सगळं कसं अगदी आराम आणि आराम! आचरावासीय सीमेपलीकडे राहत असलेल्या झोपडय़ांना, राहुटय़ांना भेट दिल्यावर घरातल्या कत्र्या घरधनणीच्या चेह:यावर एक विलक्षण तेज दिसत होते. संपूर्ण आचरावासीय वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक स्वरूपात राहताना दर तीन वर्षानी मिळणारा सहजीवनाचा अनोखा आनंद लुटत आहेत. रविवारी दुपारनंतर आचरा गाव हळूहळू रिकामे झाल्यानंतर गावक:यांनी पारवाडीच्या सीमेपलिकडे, चिंदर सडेवाडीचे माळरान, भगवंतगड रोड तर काहींनी आडबंदराच्या डोंगरावर आपल्या नव्या घरात गावपळणीनिमित्त संसार थाटले आहेत. शाळकरी मुलांना ना शाळेचे ना अभ्यासाचे टेन्शन. त्यामुळे तेही मुक्तपणो आनंदात सामील झाले आहेत. बायका गप्पांचे फड रंगवित आहेत. तरुण वर्गात मासेमारीला ऊत आला असून रविवारची रात्र अनेकांनी आपल्या तिखट जेवणाने रंगविली.
अनेक वाडय़ांमधील दररोजची भांडणो विसरून शेजारीपाजारी या निमित्ताने एकत्र आले. महिलांनी फुगडीचे फेर धरले आहेत तर किशोरवयीन मुली दांडिया, गरब्याच्या तालावर नाच करीत संपूर्ण रात्रभर जागरण करीत आहेत. नदीच्या पात्रमध्ये डुंबण्याचाही तरुणाई आनंद घेत आहेत.
तीन दिवसांचा सोहळा
एकीकडे संपूर्ण आचरा गावामध्ये सन्नाटा पसरला असून, आचरा तिठय़ावर केवळ येणा:या व जाणा:या गाडय़ांची ये-जा चालू आहे. आच:याच्या इनामदार श्री देव रामेश्वरला आपला लोककल्याणकारी राजा असल्याची श्रद्धा असलेले गावकरी तीन दिवस गावाबाहेर राहतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा रामेश्वर मंदिराच्या आवारात तोफेचा आवाज झाल्यानंतर आचरावासीयांनी संसाराचे साहित्य, पाळीव जनावरे घेऊन गाव सोडले.