"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:15 AM2022-05-03T11:15:48+5:302022-05-03T11:16:23+5:30

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली.

No case has been registered against Raj Thackeray then i will take bigger meeting then him says imtiaz jaleel | "राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

googlenewsNext

औरंगाबाद-

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. पण ते त्यांनी स्वीकारलं नाही. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यानंतर ते आता बोलावण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, असं इम्तियाज जलील म्हणाले. 

राज ठाकरेंना इफ्तारीसाठी बोलावलं होतं. आता त्यांना ईदचा शिरखुरमा खाण्यासाठी बोलावणार का? असं जलील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. "राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत ज्या पद्धतीची भाषा वापरली ती पाहता आता ते शिरखुरमाचं निमंत्रण देण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यांना मी दुरूनच ईद मुबारक देतो", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

...तर दुप्पट मोठी सभा घेऊन दाखवेन
राज ठाकरेंविरोधात कारवाईबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवरही ताशेरे ओढले. "राज ठाकरेंवर अजूनही एफआयआर दाखल का होत नाही हा प्रश्न मला पडला आहे. ते मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत म्हणून त्यांना कायदा वेगळा आहे का? मी तुम्हाला शब्द देतो की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही. तर त्यांनी जिथं सभा घेतली तिथंच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा मी घेईन, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. इम्तियाज जलील यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राज ठाकरेंवर कारवाई होणार?
मशिदीवरील भोंगे हटवावे यामागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केले. त्यानंतरच्या उत्तरसभेत आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे रोजी ज्याठिकाणचे लाऊडस्पीकर हटणार नाहीत तेथील मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. यातच राज ठाकरेंनी चिथावणीखोर विधान केले असून त्यांना अटक करावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. तसेच राज यांच्यावर कारवाईसाठी विविध संघटनांची मागणी आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरून आक्रमक इशारा दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

इम्तियाज जलील झाले भावूक
औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज अदा करताना खासदार इम्तियाज जलील भावूक झालेले पाहायला मिळाले. नमाद अदा करताना जलील यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता आपल्या आईच्या आठवणीनं आपण भावूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. "ईद ही माझी आई आहे आणि माझ्या आईचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं. तिच्या आठवणीनं मी भावूक झालो. आई ही शेवटी आई असते. तिचं स्थान सर्वांपेक्षा मोठं असतं", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

Web Title: No case has been registered against Raj Thackeray then i will take bigger meeting then him says imtiaz jaleel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.