मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही!

By admin | Published: September 14, 2014 02:00 AM2014-09-14T02:00:51+5:302014-09-14T02:00:51+5:30

चाळीसगाव येथील सभेत शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून माझा केलेला नामोल्लेख हा ‘विनोदा’चा भाग असू शकेल.

No Chief Controversial Claimant! | मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही!

मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही!

Next
नाशिक : चाळीसगाव येथील सभेत शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून माझा केलेला नामोल्लेख हा ‘विनोदा’चा भाग असू शकेल. मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही, मात्र महिला मुख्यमंत्री झाली, तर ते आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर गुगली टाकली आहे. 
संघर्षयात्रेदरम्यान शनिवारी नाशकात बोलताना पंकजा म्हणाल्या, वडील गोपीनाथ मुंडे यांनी 1995ला परिवर्तन यात्र काढून राज्यात आघाडीचे सरकार उलथवून युतीचे सरकार आणले. आपल्या संघर्ष यात्रेलाही तीच किनार आहे.  बीड लोकसभेच्या जागेवर मुंडे कुटुंबीयांचाच उमेदवार द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय 21 किंवा 22 सप्टेंबरला मी घेणार आहे. ही निवडणूक विधानसभेबरोबरच 15 ऑक्टोबरला असल्याने आपण लोकसभेसाठी इच्छुक नाही. मात्र वेळ मिळाला असता तर निश्चितपणो आपण लोकसभा निवडणूक लढविली असती, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी) 
 
1संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाकडून पंकजा मुंडे यांच्या दौ:याची माहिती मागविली आहे. 
 
संघर्ष यात्रेलाही आचारसंहिता?
2संघर्ष यात्रेची रीतसर परवानगी भाजपाने पोलिसांकडून घेतली असली तरी ती आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची होती़ परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतरही यात्रेच्या माध्यमातून राजकीय प्रदर्शन व ङोंडे, पताका, फलक लावण्यात आल्याने त्यातून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा अर्थ काढला जात आहे. 
3विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तत्काळ शहरातील राजकीय पक्षांचे फलक, बॅनर्स, ङोंडे काढण्यात येऊन जाहीर राजकीय कार्यक्रमांना त्या-त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका:यांकडून अनुमती घेण्याचा दंडक असताना मुंडे यांच्या आचारसंहितेनंतरच्या राजकीय कार्यक्रमांना अनुमती होती किंवा कसे तसेच या कार्यक्रमांची निवडणूक भरारी पथकाने व व्हिडीओ पथकाने दखल घेतली काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

Web Title: No Chief Controversial Claimant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.