Unlock4: राज्यात ई-पासशिवाय प्रवास करता येणार, अनलॉक-४ ची नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:04 PM2020-08-31T19:04:14+5:302020-08-31T19:20:20+5:30
#MissionBeginAgain : कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वेळोवेळी याचा आढावा घेतला जाणार आहे. यानुसार पुन्हा कंटेनमेंट झोन ठरविले जाणार आहेत.
केंद्र सरकारने अनलॉक ४ ची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही ल़ॉकडाऊनच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार राज्यात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास (No E-pass required) रद्द केला आहे. आता राज्यात ई-पासशिवाय प्रवास करता येणार आहे.त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वेळोवेळी याचा आढावा घेतला जाणार आहे. यानुसार पुन्हा कंटेनमेंट झोन ठरविले जाणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी, पालिकांचे आयुक्त कंटेनमेंटबाबत निर्णय घेणार आहेत.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgainpic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
काय बंद राहणार?
- शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाीन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे.
- सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत.
- एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी.
- मेट्रो सेवा बंदच राहणार आहे.
- सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत.
काय सुरु राहणार...
- सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत.
- हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
- खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे,
- आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही.
- खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
- टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी