काम करताना इगो नसावा, पण शॉर्टकटही मारू नये; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 05:56 PM2020-09-08T17:56:02+5:302020-09-08T18:56:50+5:30
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टोल्यांना प्रत्यूत्तर दिले.
काम करताना इगो असता नये आणि शॉर्टकटही मारू नये. मग रात्रीची झाडे कापावी लागतात. आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. याचबरोबर प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असा चिमटाही त्यांनी फडणवीसांना काढला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो, जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची, जी काम करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही, असे ते म्हणाले.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मेट्रोसाठी जो खर्च झाला आहे तो वाया जाऊ न देता, जर मेट्रोच्या माध्यमातून अधिकाधिक मुंबईकरांना लाभ घेता येत असेल तर त्यावर विचार करत आहोत. आरेचा भाग हा जंगल म्हणून घोषित केलेला आहे. काही जणांना कल्पना नसेल असे जगात कुठेही नसेल असे हे जंगल आहे. जगात शहरांना लागून जंगले आहेत. मात्र, प्राणी नाहीत. यामुळे सहजीवनाचा विचार केला आहे. पशू-पक्षांचे निवासस्थान सुरक्षित करू शकलो याचे समाधान आहे, असे ठाकरे म्हणाले.
यानंतर कोरोना संकटावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राज्यात तीन लॅब होत्या. आता राज्यात 530 लॅब तयार झाल्या आहेत. राज्यातील गावागावात, घराघरात आरोग्य पथके जाणार असून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये मोठी हॉस्पिटल उभारणार आहोत. कृषी उद्योगाकडेही लक्ष देणार, असे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
चीनची धमकी! भारताने रक्तरंजित संघर्षासाठी तयार रहावे; हद्द पार केली
कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा