यापुढे साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूकच नाही : श्रीपाद जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:28 PM2018-09-25T18:28:33+5:302018-09-25T18:57:04+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्वाचा बदल केला असून साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणुकच कायमस्वरुपी रद्द करून टाकली आहे.
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्वाचा बदल केला असून साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणुकच कायमस्वरुपी रद्द करून टाकली आहे. यामुळे यापुढे संमेलनाध्यक्ष संलग्न संस्था आणि विद्यमान अध्यक्षांनी सुचविलेला व्यक्ती बनणार आहे, असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.
यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनापासूनच संमेलनाध्यक्षाची निवड होणार आहे. निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. याशिवाय आतापर्यंत साहित्य महामंडळाचा भाग नसलेल्या पण आता त्याचा भाग होऊ इच्छिणाऱ्या संस्थांना आता महामंडळाचे दरवाजे खुले राहणार आहेत.
तसेच घटक संस्था, संलग्न संस्था, समाविष्ट संस्था , संमेलन निमंत्रक संस्था आणि विद्यमान संमेलन अध्यक्ष हे नव्या अध्यक्षासाठी नावे सुचवतील. यातूनच संमेलनाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे, असेही जोशी यांनी सांगितले.