पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:52 AM2017-07-27T02:52:46+5:302017-07-27T02:52:50+5:30

आॅनलाइन पीक विमा अर्ज भरण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता शेवटच्या काही दिवसांत आॅफलाइन अर्ज घेऊन त्यानंतर आॅनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील

No extension of Crop insurance scheme | पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळणार नाही

पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळणार नाही

Next

मुंबई : आॅनलाइन पीक विमा अर्ज भरण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता शेवटच्या काही दिवसांत आॅफलाइन अर्ज घेऊन त्यानंतर आॅनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील. मात्र, आॅनलाइन पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा तूर्तास कोणताच विचार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. इंटरनेट आणि इतर असुविधांमुळे ग्रामीण भागात शेतकºयांना आॅनलाइन पीक विमा उतरवताना अडचणी येत आहेत. महा ई सेवा केंद्रांमध्ये दिवसभरात मोजक्याच शेतकºयांचे पीक विम्याचे अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे आॅफलाइन पीक विमा भरण्याचे निर्देश द्यावेत आणि योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात पीक विमा आॅनलाइन भरण्याचे निर्देश दिले आहेत. यातील अडचणींबाबत कृषी खात्याने केंद्र सरकारकडे सवलत मागितली होती. मात्र, बिहार आणि आसाम यांसारख्या मागास राज्यांत आॅनलाइन पीक विमा उतरवला जात असेल तर महाराष्ट्रात काय अडचण आहे, अशी विचारणा केंद्राकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांच्याही ही बाब निदर्शनाला आणली आहे. त्यानुसार बँकांना पीक विमा भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने सुट्टीच्या दिवशीही बँकांचे कामकाज सुरू ठेवून पीक विम्याचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
‘त्या’ बारवर कारवाई करणार
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याशेजारील ‘इस्टेला’ बारप्रकरणाची पोलीस महानिरीक्षक स्तरावरील अधिकाºयांकडून १५ दिवसांत चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. इस्टेला बार प्रकरणी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला विभागाकडून देण्यात आलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचा मुद्दा नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. जे प्रश्न विचारण्यात आले त्याला उत्तर म्हणून भलतेच उत्तर देण्यात आल्याची तक्रार राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नाराजीची तत्परतेने दखल घेतली.

Web Title: No extension of Crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.