सिंचन घोटाळ्याची एकही फाइल प्रलंबित नाही !

By Admin | Published: February 16, 2015 03:20 AM2015-02-16T03:20:08+5:302015-02-16T03:20:08+5:30

सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) देण्यात आले

No file for irrigation scam is pending! | सिंचन घोटाळ्याची एकही फाइल प्रलंबित नाही !

सिंचन घोटाळ्याची एकही फाइल प्रलंबित नाही !

googlenewsNext

नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) देण्यात आले आहेत़ यासंदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे स्पष्ट केले़
नागपूर येथील धरमपेठ वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्याची चौकशी करताना फक्तकोकणातील प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतून विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पांना वगळले, अशी चर्चा आहे. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही चर्चा निराधार आहे. सिंचन घोटाळ्याशी संबंधित एसीबीने आतापर्यंत ज्या ज्या परवानग्या शासनाकडे मागितल्या आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: No file for irrigation scam is pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.