आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासकीय नोकरी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:56 AM2020-02-27T03:56:46+5:302020-02-27T03:59:13+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील दहा तरूणांनी आत्महत्त्या केल्या होत्या
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील दहा तरूणांनी आत्महत्त्या केल्या. त्यांच्या परिवारातील एकाला नोकरी आणि दहा लाख रुपये सहाय्य देण्याचे आश्वासन शासन स्तरावरून देण्यात आले नव्हते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेतील लेखी उत्तरात स्पष्ट केले.
याबाबात विनायक मेटे यांनी प्रश्न विचारला होता. बीड येथील आत्महत्त्या करणाऱ्या दहा कुटुंबियांपैकी सातजणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.
मेटे म्हणाले, कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपए तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकार कोणाचेही असो. सरकारने अशा प्रकरणांमध्ये पूर्वीच्या सरकारचे आश्वासन पाळले पाहिजे.