"गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का तसाच राहणार’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 23:23 IST2025-02-27T23:22:48+5:302025-02-27T23:23:55+5:30
Uddhav Thackeray Criticize Eknath Shine: आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

"गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का तसाच राहणार’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गंगेत जाऊन कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा डाग तसाच राहणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला आता गंगेचं पाणी देण्यात आलं. मला मान आहे. सन्मान आहे. इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली याला काही अर्थ नाही. गंगेत जाऊन कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा डाग तसाच राहणार आहे.
दरम्यान, आपण हिंदुत्व सोडलेलं नसल्याच पुनरुच्चार करतानाच उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गट हा मराठीच्या मुद्द्यावर कायम आक्रमक राहील, असे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, हिंदुत्व सोडायला ते काही धोतर नाही आहे, असं मी मागेही म्हटलं होतं. गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनीच दिली होती. ती घोषणा आपली आहेच. पण त्यासोबच अभिमानाने स्वाभिमानाने म्हणा की आपण मराठी आहोत, असं आज मी तुम्हाला आवाहन करतो, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
त्याबरोबरच मराठी भाषेचा अभिमान बाळगणं म्हणजे इतर भाषांचा दु:स्वास करणं असा होत नाही. मात्र महाराष्ट्रात याल तेव्हा आमच्या मातृभाषेचा मान राखला गेलाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.