बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही; भाजपचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:25 PM2023-06-14T14:25:33+5:302023-06-14T14:44:26+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही आज ते मान्य केलेले आहे. असे असताना आज भाजपा नेते अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली आहे. 

No matter how much a frog swells, it cannot become an elephant; BJP's anil bonde comment on Eknath Shinde's add compare with Devendra Fadanvis | बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही; भाजपचा एकनाथ शिंदेंना टोला

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही; भाजपचा एकनाथ शिंदेंना टोला

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वाधिक पसंतीचे मुख्यमंत्री असल्याची जाहिरात काल प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी विरोधकांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपात ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला. ही ठिणगी खरोखरच मोठी आग बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही आज ते मान्य केलेले आहे. असे असताना आज भाजपा नेते अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली आहे. 

थोडे मतभेद झाले, पण...; शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष स्पष्टच बोलले

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागला आहे, असे बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

फडणवीस आज महाराष्ट्रात असा चेहरा आहे जो बहुजनांसाठी काम करतो. ओबीसी, मराठा आरक्षण असो, धनगर समाजाची भलाई असो सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचे काम फडणवीस य़ांनी केले आहे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात फिरताना पाहतो, असे ते म्हणाले. 

यानंतर लगेचच शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. आमची भुमिका कालच देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे. यावर अनिल बोंडे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, हा विषय इथेच संपवावा, असा सल्ला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बोंडे यांना दिला आहे. 

तर दुसरीकडे नितेश राणे यांनी सकाळीच आपल्या युतीमधला संजय राऊत कोण? याचा शोध घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. युतीत काड्या करणारा शकुनी मामा आपल्या युतीमध्ये आला नाही ना याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. 

Read in English

Web Title: No matter how much a frog swells, it cannot become an elephant; BJP's anil bonde comment on Eknath Shinde's add compare with Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.