एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Published: July 18, 2016 05:22 AM2016-07-18T05:22:57+5:302016-07-18T05:22:57+5:30

‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे.

No minister will give resignation - Chief Minister | एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

Next


मुंबई : ‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे. केवळ विरोधक आरोप करतात म्हणून कोणीही मंत्री राजीनामा देणार नाही. उलट प्रत्येक आरोपाचे ठाम उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पाठराखण केली.
पत्रपरिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की मंत्री कुठे चुकले असतील तर विरोधकांनी दाखवून द्यावे. आम्ही चर्चेला तयार आहोत. त्यानी १५ वर्षांत काय काय केले ते लपून राहिलेले नाही. अर्थात त्यांनी काही केले म्हणून तसे करण्याचे लायसन्स आम्हाला मिळालेले नाही. शून्य भ्रष्टाचार हेच आमच्या कारभाराचे सूत्र असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
निर्णय शेतकरी हिताचाच
बाजार समित्यांच्या बाहेर फळे, भाजीपाल्याच्या विक्रीस परवानगी देण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की बहुतेक व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. इतरांशी चर्चा करण्यात येईल. सरकार व्यापाऱ्यांच्या नाही तर मक्तेदारीच्या विरोधात आहे. तूरडाळीच्या भावाबाबत ते म्हणाले, की किंमत नियंत्रण कायदा संमतीसाठी राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अलिकडच्या दिल्ली भेटीत आपल्याला दिले आहे.
विषय नसलेला सैराट विरोधी पक्ष
कुठलेही मुद्दे; विषय नसलेला विरोधी पक्ष आपण यापूर्वी पाहिलेला नव्हता. विरोधक दुर्देवाने अजून सैराटमध्येच अडकले आहेत. सैराटपलिकडेदेखील जग आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.
नगरमधील तणावाबद्दल चर्चा करू
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन क्रुरपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. पण या घटनेवरून जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि विविध संघटनांच्या नेत्यांशी आपण चर्चा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: No minister will give resignation - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.