सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास प्रस्ताव
By Admin | Published: December 12, 2014 02:49 AM2014-12-12T02:49:38+5:302014-12-12T02:49:38+5:30
सरकारला घेरण्याकरिता एकत्र आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभय सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावरून फूट पाडण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली आहे.
नागपूर : दुष्काळाच्या प्रश्नावर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला घेरण्याकरिता एकत्र आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभय सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावरून फूट पाडण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधान परिषदेत राष्ट्रवादीची सदस्य संख्या अधिक असताना विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे गेले पाहिजे हे स्पष्ट असताना सभापती घोषणा करीत नसल्याने नाइलाजाने आम्हाला अविश्वास प्रस्ताव दाखल करावा लागला, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)