सभापतींवरील अविश्वास प्रस्ताव पुढील अधिवेशनात
By admin | Published: December 13, 2014 02:30 AM2014-12-13T02:30:07+5:302014-12-13T02:30:07+5:30
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता नाही.
Next
नागपूर : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता नाही. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या ठरावावर चर्चा होऊ शकते.
सभापती देशमुख यांच्या विरोधात 11 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधिमंडळ कामकाजाच्या नियमानुसार प्रस्ताव दाखल झाल्यानंतर 14 दिवसांनंतर तो चर्चेला घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार 25 डिसेंबर रोजी ही मुदत संपते. अधिवेशनाचा कामकाज सल्लागार समितीने आतार्पयत निश्चित केलेला कालावधी 18 डिसेंबर्पयत आहे. हा कालावधी वाढवून 25 तारखेच्या पुढे जाण्याची शक्यता धूसर आहे. शिवाय नियमानुसार 14 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुढील 1क् दिवसांत खुद्द सभापतीच हा ठराव केव्हा चर्चेला घ्यायचा त्याचा निर्णय करु शकतात, अशी तरतूद असल्याने जानेवारीच्या 4 तारखेला ही 1क् दिवसांची मुदत संपते. अधिवेशन इतके दीर्घकाळ चालणो अशक्य असल्याने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव चर्चेला येणो अशक्य आहे. अधिवेशनाच्या अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली तर विधान परिषदेतही घोषणा होऊ शकेल. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आपला ठराव मागेही घेऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)