भेटी लागी जिवा! कार्तिकी वारीला परवानगी; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:19 PM2021-11-04T14:19:49+5:302021-11-04T14:23:15+5:30

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती; यंदा पंढरपूरात आनंद सोहळा

no need for separate permission for kartiki wari says health minister rajesh tope | भेटी लागी जिवा! कार्तिकी वारीला परवानगी; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

भेटी लागी जिवा! कार्तिकी वारीला परवानगी; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

googlenewsNext

सोलापूर: कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी १५ नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं वारीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख वारींच्या निमित्तानं दरवर्षी पाच ते दहा लाख वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. राज्यात असलेल्या कोरोना संकटामुळे १७ एप्रिल २०२० पासून विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत होऊ शकली नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आषाढी वारीच्या निमित्तानं मानाच्या पालख्या एसटी बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. राज्यात ७ कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाची वारी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 

Web Title: no need for separate permission for kartiki wari says health minister rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.