धरणांच्या सर्वेक्षणाची गरज नाही!
By admin | Published: September 1, 2016 06:02 AM2016-09-01T06:02:14+5:302016-09-01T06:02:14+5:30
राज्यातील मोठ्या धरणांसह छोटे-मोठे प्रकल्पही चांगल्या स्थितीत असून, त्यांच्या सर्वेक्षणाची गरज नाही़ ‘डॅम सेफ्टी’ विभागांतर्गत नियमित तपासणी होत
अहमदनगर : राज्यातील मोठ्या धरणांसह छोटे-मोठे प्रकल्पही चांगल्या स्थितीत असून, त्यांच्या सर्वेक्षणाची गरज नाही़ ‘डॅम सेफ्टी’ विभागांतर्गत नियमित तपासणी होत असून, वर्षभरात धरणांची गळतीही बंद करण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले़
महाजन म्हणाले, ‘धरणांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, अनेक ठिकाणी कामालाही सुरुवात झाली आहे़ पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणाचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे़ यंदा पाऊस चांगला झाला असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे़ जायकवाडीतही ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे़’
सिंचन प्रकल्पांच्या कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत सरकार गंभीर असून, कुणाचीही गय केली जाणार नाही. राज्यात अनियमितता आढळून आलेली ९४ कामे रद्द करण्यात आली आहेत़ भ्रष्टाचारात सहभागी अधिकारी, ठेकेदारांसह सर्वच संबंधितांवर काही दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे महाजन म्हणाले़ (प्रतिनिधी)