'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 08:08 PM2024-11-02T20:08:25+5:302024-11-02T20:09:21+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यातील साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करण्याची मागणी केली आहे.

No one should be deprived of voting, start sugar factories after November 21 Sadabhau Khot demanded | 'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी

'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहेत. तर दुसरीकडे साखर आयुक्तांनी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता आमदार सदाभाऊ खातो यांनी साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करण्याची मागणी केली आहे. 

याच महिन्यात राज्यातील साखर कारखान्यामध्ये गाळप सुरू होत असतात. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार येत असतात. या कामगारांना मतदान करता यावे यासाठी २१ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरु करण्यात यावेत अशी मागणी व्हिडीओद्वारे आमदार  सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजले आहेत. साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरु करावेत असे आदेश काढले आहेत. हा आदेश मागे घेणे गरजेचे आहेत. कारण राज्यातील ऊसतोडणीसाठी मजूर वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतात. हे सर्व मजूर मतदानापासून वंचित राहतील, त्यांचं मतदान होणं गरजेचे आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकाला बजावता आला पाहिजे या भूमिकेतून राज्यातील सर्व साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करावेत, अशी मागणी मी केलेली आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले. 

Web Title: No one should be deprived of voting, start sugar factories after November 21 Sadabhau Khot demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.