कोई कसर नहीं छोडेंगे!
By admin | Published: September 21, 2015 12:55 AM2015-09-21T00:55:34+5:302015-09-21T00:55:34+5:30
कुंभ के आयोजन में कोई कसर नहीं छोडेंगे... नाशिकप्रमाणेच उज्जैनचाही कुंभमेळा निर्विघ्न पार पाडू.
नाशिक : कुंभ के आयोजन में कोई कसर नहीं छोडेंगे... नाशिकप्रमाणेच उज्जैनचाही कुंभमेळा निर्विघ्न पार पाडू. इथल्याप्रमाणेच आदर्श व्यवस्था ठेवू, अशी ग्वाही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंंह चौहान यांनी प्रमुख महंतांना दिली.
येत्या एप्रिलमध्ये उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून, या पर्वाचे तिन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांना निमंत्रण देण्यासाठी शिवराजसिंह चौहान हे पत्नी साधनासिंह यांच्यासह नाशिकच्या साधुग्राममध्ये आले होते. त्यांनी प्रथम निर्वाणी अनी आखाड्यात जाऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास, श्री महंत धरमदास, श्री महंत गौरीशंकरदास, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास आदिंची, तर नंतर दिगंबर आखाड्यात जाऊन श्री महंत कृष्णदास, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, श्री महंत वैष्णवदास यांची भेट घेतली. या सर्वांचे औक्षण करीत त्यांना कुंभमेळ्याचे रीतसर निमंत्रण दिले. महंतांच्या वतीने चौहान यांचा सत्कार करण्यात आला.
प्रचंड गर्दी होऊनही आणि अखेरच्या पर्वणीला १८ तास पाऊस पडूनही नाशिकच्या अधिकाऱ्यांनी सेवक होऊन चोख व्यवस्था ठेवली. नाशिकच्या धर्तीवर उज्जैनमध्येही साधू-संतांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा श्री महंत ग्यानदास यांनी व्यक्त केली.
चौहान यांच्याबरोबर उज्जैन मेळा प्राधिकरण अध्यक्ष दिवाकर नातू व अन्य अधिकारी उपस्थित
होते.