सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

By admin | Published: July 2, 2016 06:37 PM2016-07-02T18:37:05+5:302016-07-02T18:37:05+5:30

जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

No one will leave the power - BJP - Sharad Pawar | सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

सेना - भाजपाच्या वादातून कुणीही सत्ता सोडणार नाही - शरद पवार

Next
>ऑनलाइन लोकमत - 
बार्शी, of. 02 -  हवामान खात्याच्या अंदाजानूसार पाऊस पडणार म्हटल्याचे दिवस गेले आहेत, जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे, अशीच स्थिती राहीली तर काळजी करावी लागेल मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार हे बार्शीतील सुविधा हॉस्पिटलच्या शुभारंभानिमीत्त बार्शी दौ-यावर आले होते, यादरम्यान ते भोजनासाठी आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील डॉ. आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, या ट्रस्टचे प्रमुख असलेले रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे, तरी देखील प्रकाश आंबेडकरासह सर्वजण तक्रारी करीत आहेत ,त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते, हा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे,त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती जाणून घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा असा सल्ला पवार यांनी दिला.
 
पाऊस नसल्यामुळे काळजी करण्याचे दिवस आहेत. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर ,पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी पाऊस नाही, काही ठिकाणी शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत असंही शरद पवार बोलले आहेत.
 
भाजपा-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेल्या शोले वादासंदर्भात प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले सेना-भाजपाच्या  या वादातून काहीही होणार  नाही. कुणीही सत्ता सोडणार नाही,कारण गुळाच्या ढेपेला मुंगळे हे चिटकलेले असतात तशी स्थिती आहे. ते एकमेकाविरोधात बोलतील, चर्चा करतील वाद करतील,भांडतील मात्र गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगतील असा चिमटा पवारांनी काढला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का ? असे विचारले असतो याबाबत सांगता येणार नाही, अद्याप तशी बैठक झालेली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येणे अवघड असते, प्रत्येकाचा स्थानिक इन्ट्रेस्ट असतो, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, मात्र एकत्र येणार नाही  असे नाही असेही ते म्हणाले.
 
अनेक खाजगी कारखान्यांनी कॉर्पोरेट लोनच्या नावाखाली शेतक-यांच्या शेअर्स व जमीनीवर कर्ज घेतल्याचे उघड झाले त्यावर बोला असे म्हणतातच याबाबत मला काही माहित नाही, मात्र असे झाले असेल तर ती फसवणूक आहे, याबाबत कायदेशीर कारवाईच करावीच लागेल. छत्रपती अनं पेशवे याबत विचारले असते तो प्रश्न आता संपलेला आह़े तसेच मी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करुन बोलतो असेही शरद पवार म्हणाले. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिपक सांळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल ,नगराध्यक्ष दगडू मांगडे,नागेश अक्कलकोटे, आर्यन सोपल, युवराज काटे आदी उपस्थित होत़े 
 

Web Title: No one will leave the power - BJP - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.