मुंबई विमानतळ उडवण्याबाबत धमकीचा फोन आलाच नाही......
By Admin | Published: January 24, 2016 08:33 AM2016-01-24T08:33:17+5:302016-01-24T08:33:17+5:30
मुंबई विमानतळ उडवण्याबाबत धमकीचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीटीआयच्या हवाल्यातून ही माहिती मिळाल्याने विमानतळ उडवण्याची धमकी ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ : मुंबई विमानतळ उडवण्याबाबत धमकीचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीटीआयच्या हवाल्यातून ही माहिती मिळाल्याने विमानतळ उडवण्याची धमकी ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) मुंबई विमानतळ २ फेब्रुवारीच्या आधी उडवून देण्याची धमकीवजा फोन उत्तर प्रदेशातून आल्याचं वृत्त होत.
विमानतळाच्या कंट्रोल रुमला माहिती विचारण्यासाठी कॉल आला होता मात्र कोणत्याही प्रकारची धमकी आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तरीही आयसिसच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात आणि विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळी विमानतळाच्या कंट्रोल रुमला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याबाबत धमकीचा फोनकॉल आल्याची माहिती होती, मात्र पोलिसांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे.