पुढील ५ दिवस उघडीप; राज्यात पुन्हा दमदार पाऊस परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:16 AM2022-07-31T06:16:41+5:302022-07-31T06:16:53+5:30
मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. हवामानात झालेले बदल पुढेही कायम राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. हवामानात झालेले बदल पुढेही कायम राहणार असून, ३१ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत अशा एकूण १८ जिल्ह्यांत पावसाची अधिक उघडीपीची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणातील ४, विदर्भातील १० जिल्ह्यांत व दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. तसेच, ५ ते १५ ऑगस्टपर्यंत माॅन्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येऊन महाराष्ट्रात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
२८ जिल्हे व ३०९ गावे अतिवृष्टीमुळे प्रभावित
८३ सरकारकडून तात्पुरती निवारा केंद्र तयार
१४४८० नागरिक सुरक्षितस्थळी
११२
नागरिकांनी अतिवृष्टीमुळे जीव गमावला
४४
घरांचे पूर्णत: तर
२ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान