तलाव क्षेत्रंत पाऊस नाहीच!
By admin | Published: July 12, 2014 01:32 AM2014-07-12T01:32:45+5:302014-07-12T01:32:45+5:30
उष्णतेने हैराण मुंबईकरांना जुलै महिन्यात दिलासा मिळाला तरी तलाव क्षेत्रे मात्र तहानलेलीच आहेत़
Next
मुंबई : उष्णतेने हैराण मुंबईकरांना जुलै महिन्यात दिलासा मिळाला तरी तलाव क्षेत्रे मात्र तहानलेलीच आहेत़ मुंबईत सर्वत्र धोधो कोसळणारा पाऊस तलावांकडे मात्र फिरकलाच नाही़ हीच परिस्थिती कायम राहिल्यास उपलब्ध जलसाठय़ात मुंबईची तहान भागविण्याचे आव्हान पालिकेपुढे आह़े
गेले काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण असून, पावसाने चांगला जोर धरला आह़े यामुळे तलाव क्षेत्रंमधील चित्र पालटेल, अशी आशा व्यक्त होत होती़ मुंबईत असलेल्या विहार व तुळशी तलावांमध्ये दिवसभरात सरासरी 75 मि़मी़ पाऊस झाला आह़े परंतु, ठाणो जिल्ह्यात असलेल्या तलावांमध्ये पावसाने अद्यापही दांडीच मारली आह़े
पूर्व उपनगरांनाही फटका
पूर्व उपनगरातील डोंगराळ भागातील पावसाचे पाणी सखल भागांत साचल्याने मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपरमधील काही भाग जलमय झाले होते. मुसळधार पावसामुळे भांडुप येथील प्रतापनगरमधल्या घराची भिंत पडली. (प्रतिनिधी)
तलावकमाल साठाआजचा साठाकिमान साठाआजचा पाऊस
मोडक सागर163़15153़49143़2615.4क् (मि़मी़)
तानसा128़63119़73118़8717.4क्(मि़मी़)
विहार8क़्1274़3173़921क्8 (मि़मी़)
तुळशी139़17134़72131़क्7123 (मि़मी़)
अपर वैतरणा6क्3़51593़71594़55--
भातसा142़क्71क्6़281क्4़9क्--