Maharashtra Coronavirus News: कोरोना संकटात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३० जूनपर्यंत लागू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 20:17 IST2021-05-10T18:44:48+5:302021-05-10T20:17:45+5:30
CoronaVirus News : No Routine transfers till 30th June Thackeray government passes order amid corona crisis :- कोरोना परिस्थितीत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण येऊ यासाठी महत्त्वाचा आदेश जारी

Maharashtra Coronavirus News: कोरोना संकटात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३० जूनपर्यंत लागू राहणार
मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत काहीसा कमी होताना दिसत आहे. मात्र प्रशासनावरील ताण कमी झालेला नाही. पुढील काही दिवस परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे १५ मेपर्यंत असलेला लॉकडाऊनदेखील वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. १५ मेपर्यंत राज्यात निर्बंध लागू असतील. मात्र या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे नियमित बदल्या रोखण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. Maharashtra Lockdown :- No Routine transfers till 30th June Thackeray government passes order amid corona crisis
रामबाण उपाय! देशाचा 'हनुमान' आला कामी; कोरोना संकटात मिळाली 'संजीवनी'
राज्यातील कोरोनाचा Corona Virus वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर ३ वर्षांनी केल्या जातात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत.
कोरोनाचा कहर रोखण्यासाठी नाशकात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन
३० जूनपर्यंत रुटिन बदल्या केल्या जाणार नाहीत. मात्र आपत्कालीन बदल्या केल्या जाऊ शकतात. सेवानिवृत्तीमुळे रिक्त भरलेली पद भरणं, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणं, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणं असे निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन वेळोवेळी याबद्दल पुढील आदेश काढले जाणार आहेत.