उरली नाही नीती, 'मातोश्री'च्या फायद्यासाठीच केली युती; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:46 PM2019-02-19T12:46:55+5:302019-02-19T13:16:42+5:30
काल शिवसेना-भाजपा पक्षाने युती जाहीर केली. यावर नारायण राणे यांनी आज पहिलीच प्रतिक्रिया दिली.
मुंबई : शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष असून त्यांच्या नेत्यांनी युती करून स्वत:चीच फजिती करून घेतली. भाजपा वाल्यांनी सांगितले असेल की आता सडवणार नाही. यामुळे जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झाल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. ही मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत. कित्येक प्रकल्प मातोश्रीच्या भागीदारीवर सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना फक्त 10 जागा जिंकेल असे भाकितही राणे यांनी केले.
काल शिवसेना-भाजपा पक्षाने युती जाहीर केली. यावर नारायण राणे यांनी आज पहिलीच प्रतिक्रिया दिली. युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाहीत. जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झालेली आहे. सेना भाजपबाबत जे बोलली, ते वागणे, बोलणे, ती टीका भाजपाचे कार्यकर्ते विसरणार नाहीत. एकत्र आले तरीही मने जुळणार नाहीत. काल कुठेही उत्साह नव्हता. कार्यकर्ते बाहेर उभे होते. युती झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे अभिनंदनही केले नाही. जशी युती झाली तसे कार्यकर्ते घरी गेले. तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना, अशी या युतीची अवस्था असल्याची टीका राणे यांनी केली.
शिवसेनेचे जेथे जेथे उमेदवार असतील त्यांना पाडण्यासाठी राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काम करेल : नारायण राणे @ShivSena@NiteshNRane
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
25 मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार इच्छुक होते. ते नाराज झाले आहेत. कसे शिवसैनिक भाजपाला मतदान करणार. नाणार प्रकल्प रद्द झाला का? जबरदस्तीने प्रकल्प का राबवायचा. सत्तेत असून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी काही करू शकला नाही. मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी कमी झाली याला जबाबदार कोण. त्याचे उत्तर का देत नाही उद्धव ठाकरे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपातून बाहेर पडणार, पण 'अब की बार मोदी सरकार'!; नारायण राणेंचा 'बाहेरून पाठिंबा'
नाणार प्रकल्प रद्द झाला का? जबरदस्तीने प्रकल्प का राबवायचा. सत्तेत असून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी काही करू शकला नाही. मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी कमी झाली याला जबाबदार कोण. त्याचे उत्तर का देत नाही उद्धव ठाकरे, असे ही राणे यांनी विचारले.
शिवसेनेचे जेथे जेथे उमेदवार असतील त्यांना पाडण्यासाठी राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काम करेल, असा इशाराही राणे यांनी दिला.