शौचालय नसेल; तर रेशनवर धान्य नाही!

By Admin | Published: October 14, 2016 02:12 AM2016-10-14T02:12:37+5:302016-10-14T02:12:37+5:30

घरामध्ये शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी डिसेंबरअखेरपर्यंत शौचालय बांधावे, अन्यथा १ जानेवारीपासून अशा शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य व रॉकेल वितरण बंद

No toilet; If there is no grain on the ration! | शौचालय नसेल; तर रेशनवर धान्य नाही!

शौचालय नसेल; तर रेशनवर धान्य नाही!

googlenewsNext

- संतोष येलकर / अकोला
घरामध्ये शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी डिसेंबरअखेरपर्यंत शौचालय बांधावे, अन्यथा १ जानेवारीपासून अशा शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य व रॉकेल वितरण बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांकडून अशा शिधापत्रिकाधारकांना शौचालय बांधण्यासाठी आग्रहाची विनवणी करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१७-१८ पर्यंत अकोला जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी २०१६-१७ मध्ये ४३ हजार ३६५ कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आता जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य व रॉकेलसाठी रास्त भाव दुकानांमध्ये येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना येत्या डिसेंबर अखेरपर्यंत शौचालय बांधण्याचा आग्रह, रास्त भाव दुकानदारांकडून करण्यात येत आहे. शौचालय न बांधल्यास नव्या वर्षात धान्य, रॉकेल मिळणार नसल्याचा सल्लादेखील दिला जात आहे.

Web Title: No toilet; If there is no grain on the ration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.