ना टीव्ही, ना पंखा शेतकऱ्याला आले चक्क १ लाखाचे वीजबिल; महावितरणचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:46 AM2022-07-05T07:46:38+5:302022-07-05T07:46:59+5:30

जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत.

No TV, no fan, farmer gets electricity bill of Rs 1 lakh from Mahavitaran | ना टीव्ही, ना पंखा शेतकऱ्याला आले चक्क १ लाखाचे वीजबिल; महावितरणचा भोंगळ कारभार

ना टीव्ही, ना पंखा शेतकऱ्याला आले चक्क १ लाखाचे वीजबिल; महावितरणचा भोंगळ कारभार

googlenewsNext

दीपक साबने

जिवती (चंद्रपूर) : घरी केवळ दोन बल्ब, ना पंखा, ना टीव्ही. विजेचा वापर केवळ २० युनिट तरीही वीज वितरण कंपनीने एका गरीब शेतकऱ्याला चक्क एक लाख ३८० रुपयांचे वीज बिल पाठविल्याचा प्रकार जिवती तालुक्यात समोर आला आहे. यावरून विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत. तरीही त्यांच्या ग्राहक क्रमांक ४५६९५७०२०९०२ या वीजपुरवठा देयकावर फक्त २० युनिट वीज वापराचे एक लाख तीनशे ऐंशी रुपयांचे वीजपुरवठा देयक महावितरण कंपनीकडून प्राप्त झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले वीजपुरवठा देयक पाहून केशवराव कोटनाके यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने महावितरणचे कार्यालय गाठले. तेव्हा अधिकाऱ्यांनी ४४ हजार २९० रुपये इतके वीज बिल करून दिले; परंतु इतके वीजपुरवठा देयक भरायचे तरी कसे, असा प्रश्न आता कोटनाके यांच्यासमोर आहे. 

एकत्रित रीडिंगच्या  बिलामुळे ग्राहकास वीज बिल जास्त आले; परंतु सदर बिल महिन्यांमध्ये विभाजन करून दिल्याने ग्राहकास युनिट रेटचा फायदा मिळवून वीज बिल कमी होत आहे. एकत्रित बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आम्ही सध्या चालू रीडिंग घेऊन योग्य बिले ग्राहकास देत आहोत.- नितेश ढोकणे, उपअभियंता 

Web Title: No TV, no fan, farmer gets electricity bill of Rs 1 lakh from Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.