छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:56 PM2020-01-14T12:56:09+5:302020-01-14T12:57:59+5:30
उद्यन राजे भाेसले यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जाेरदार टीका केली.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अनेकदा केली जाते. लाेकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का माहीत नाही. पुस्तक पाहून वाईट वाटलं. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. हे जे पुस्तक प्रकाशित झालं. गाेयल यांनी माेदींची तुलना महाराजांशी केली. जगात महाराजांची बराेबरी करण्याची उंची काेणाची नाही. एक युगपुरुष म्हणजे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करताे. जानता राजा उमपा देताना विचार करण्याची गरज आहे असे मत भाजपाचे नेते उदयन राजे भाेसले यांनी व्यक्त केले. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
उदयन राजे म्हणाले, जगातील धार्मिक स्थळांमध्ये त्या देशातील याेद्धे आहेत त्यांच्या प्रतिमा पाहायला मिळत नाहीत परंतु भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा धार्मिक स्थळांमध्ये पाहायला मिळते. आजही शिवाजी महाराजांचे नाव काढल्यावर चैतन्य निर्माण हाेते. त्यामुळे त्यांची तुलना तर साेडून द्या त्यांच्या जवळपासही काेणी जाऊ शकत नाही. महाराजांचं आत्मचरित्र वाचून आपण त्याचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करु शकताे, परंतु आपण शिवाजी महाराज हाेऊ शकत नाही.
आजपर्यंत प्रत्येकवेळेस लुडबूड करणारे लाेक असतात. त्यांचे नाव घ्यायचे नाही मला. वाईट एवढंच वाटतं की काही झालं तरी ब्लेम गेम केला जाताे. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलाे याचा सार्थ अभिमान आहे. मागच्या जन्मी माझ्याकडून चांगलं काम झालं असेल म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. मी हे माझं साैभाग्य माणताे. महाराजांचा वंशज म्हणून नावाचा दुरपयाेग केला नाही. राजेशाही गेल्यानंतर लाेकशाही आल्यानंतर आम्ही लाेकशाही मान्य केली. तुम्ही आम्ही बराेबर आहाेत ही संकल्पना चुकीची नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव संकल्पना आता कुठे गेली. असा प्रश्न देखील उदयन राजे यांनी उपस्थित केला.
काेणीतरी काहीतरी लिखान करायचे. आम्ही त्यांना लिखान करण्यासाठी मानधन दिले नव्हते. त्यांची लायकी त्याने ओळखावी. शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ? महाविकास आघाडीचं राजकारण चुलीत गेलं, मी आजपर्यंत समाजकारण केलं. महाशिवआघाडी मधून शिव का काढलं ? साेयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. महाराजांचे वंशज असलाे तरी विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. देशातील प्रत्येकजण शिवाजी महाराजांचे माेठे कुटुंब आहे. महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. असेही उदयन राजे यावेळी म्हणाले.