राजकारणात व समाजकारणात कोणी कोणाला मोठं करीत नाही- सदाभाऊ खोत
By admin | Published: May 25, 2017 06:25 PM2017-05-25T18:25:10+5:302017-05-25T19:59:29+5:30
शेतक-यांच्या हिताचे काम करीत असताना कोण काय म्हणत याकडे मी कधीच लक्ष देत नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 25 - शेतक-यांच्या हिताचे काम करीत असताना कोण काय म्हणत याकडे मी कधीच लक्ष देत नाही. मला काय करायचे आहे ते मी करणार. राजकारणात आणि समाजकारणात कोणी कोणाला मोठं करीत नाही आणि कोणी कोणाला संपवित नाही. आपण आपल्या कर्तृत्वाने मोठे होतो व संपतोही, असा टोला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता मारला. सांगवी येथे शेतकरी आठवडा बाजाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि फरगडे फामर्स इंडिया प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्रीसावता माळी शेतकरी आठवडे बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले, शेतक-यांच्या हितासाठी मागील अडीच वर्षांत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. मातीची भाषा कुठंही बसून समजत नाही तर त्यासाठी मातीत बसावे लागते. म्हणून आम्ही शेतक-यांसाठी बांधावरची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे थेट शेतक-यांचे प्रश्न शेतक-यांच्या तोंडून ऐकले जातील व त्यावर तोडगा काढला जाणार आहे. राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेबद्दल बोलण्याचे त्यांनी टाळले, आम्ही काय करावे हे त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही मारला.