देशाच्या विरोधात बोलण्याचे कोणालाही स्वातंत्र्य नाही
By admin | Published: May 29, 2016 01:08 AM2016-05-29T01:08:23+5:302016-05-29T01:08:23+5:30
राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही.
नाशिक : राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. या देशाचे तुकडे व्हावे, असे क ोणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.
भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या सावरकर वाड्याच्या नूतनीकृ त इमारतीचे पर्रिकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) लोकार्पण झाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत,आदी उपस्थित होते.
पर्रिकर म्हणाले, की देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (प्रतिनिधी )
त्यांना अंदमानला
पाठवा : राऊत
स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रेरणास्त्रोत असून, त्यांनीच देशभरात स्वातंत्र्याचा वणवा पेटवला, परंतु अनेकदा त्यांच्या विरोधात टीका होते. अशा टीकाकारांना एक दिवस अंदमानच्या तुरुंगात पाठवा, मग त्यांना सावरकर कोण होते हे कळेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.