शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाही

By Admin | Published: March 5, 2015 01:26 AM2015-03-05T01:26:17+5:302015-03-05T01:26:17+5:30

पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल.

Nobody likes Shivsena's behavior | शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाही

शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाही

googlenewsNext

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेच मतभेद मिटवतील
मुंबई : शिवसेना फोडून सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाने कधीच केला नाही. त्यामुळे पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल. आता सतत टीका करीत राहण्याचे शिवसेनेचं वागणं जनतेलाही पसंत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक
इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार होते व मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान भाऊ होता. त्यावेळी आम्ही जसे वागलो तसे आता शिवसेनेने वागले पाहिजे, असा सल्लाही दानवे यांनी दिला.
ते म्हणाले, पूर्वीच्या युती सरकारमध्यहेही रुसवेफुगवे होते. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांचे नेतृत्व होते.ते दोघे नेते कुणाला वाद घालायची संधी देत नव्हते. आमच्यातील सध्याचे मतभेद समन्वय समितीत मिटले नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते मिटवणे अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी)

सन्मानपूर्वक जागावाटप हवे : राज्यातील मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका भाजपा व शिवसेनेने बरोबर लढाव्यात ही आमची भूमिका आहे. मात्र त्याकरिता सन्मानपूर्वक जागावाटप झाले पाहिजे अन्यथा दोन्ही पक्ष आपापल्या स्तरावर निर्णय घेऊ शकतात, असे ते म्हणाले.

गडकरी यांचे मार्गदर्शन घेतो
पक्ष संघटनेत काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेते. या तिघांनी चर्चा करूनच आपली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला, असेही दानवे यांनी सांगितले.
दुनिया उम्मीद पे जिती हैं
महामंडळाच्या नियुक्त्या न झाल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा इन्कार केला. जोपर्यंत कुठले महामंडळ भाजपाकडे राहणार व कुठले शिवसेनेकडे ते ठरत नाही तोपर्यंत नियुक्त्या होणार नाहीत हे आमदारांना माहित आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे नेहमीच अनेक मुख्यमंत्री वरचेवर सांगत आले आहेत. दुनिया उम्मीद पे जिती है, अशी टिप्पणी दानवे यांनी केली.

Web Title: Nobody likes Shivsena's behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.